Breaking : अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलावर मालकाचा अनैसर्गिक अत्याचार! SaamTvnews
मुंबई/पुणे

Breaking : अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलावर मालकाचा अनैसर्गिक अत्याचार!

शिवाजीनगर परिसरातील हाजीअली केटरर्स बिर्याणी दुकानदाराचं दुष्कृत्य, आईला माहिती दिल्यानं मुलाचे दातही पाडले!

अजय दुधाणे

अंबरनाथ : बिर्याणीच्या दुकानात काम करणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर त्याच्याच मालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी नराधम मालकाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर परिसरात हाजीअली केटरर्स नावाचं बिर्याणीचं दुकान आहे. या दुकानात एक १६ वर्षांचा मुलगा काम करतो.

हे देखील पहा :

हा मुलगा चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी दुकानात झोपलेला असताना दुकान मालक उमर खान याने दुकानात येऊन त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर पीडित मुलाने गावी असलेल्या आपल्या आईला फोन वरून याची माहिती दिली. त्यावरून मुलाच्या आईने मालक उमर खान याला याचा जाब विचारला असता त्याला राग आल्यानं त्यानं पीडित मुलाचं डोकं भिंतीवर आपटत त्याला जबर मारहाण केली. ज्यात या मुलाचे दोन दातही पडले.

दुसऱ्या दिवशी बिर्याणीच्या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने पीडित मुलाला तुझा चेहरा का सुजला आहे? याबाबत विचारणा केली असता मुलाने त्याला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. या ग्राहकाने शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी उमर खान याला तत्काळ बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT