Breaking Pune : पुण्यात वाळू माफियांचे टोळीयुद्ध; दोन ठार! सागर आव्हाड
मुंबई/पुणे

Breaking Pune : पुण्यात वाळू माफियांचे टोळीयुद्ध; दोन ठार!

पूर्वीच्या वादातून उरळीकांचन येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने आज दुपारच्या सुमारास गोळीबार केला. भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पूर्वीच्या वादातून उरळीकांचन येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने आज दुपारच्या सुमारास गोळीबार केला. भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेत संतोष जगताप याचा मृत्यू झाला असून प्रत्युत्तरात बचावासाठी केलेल्या गोळीबारात टोळक्यातील एका हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेत संतोष जगताप याचा अंगरक्षक देखील जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा :

आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संतोष जगताप उरळी कांचनमधील पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनई समोर चर्चा करत थांबला होता. या दरम्यान, रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्याच्या अंगरक्षकावर घातक हत्यारांनी हल्ला कला तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला. तर, जखमी अवस्थेत संतोष जगताप याने देखील हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर इतर जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

संतोष जगताप याला जखमी अवस्थेत लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, संतोष जगताप याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द भडकल्याची चर्चा सध्या सुरु आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

'गोकुळ'च्या राजकारणात मोठा भूकंप! सतेज पाटलांचा खळबळजनक दावा, ४ संचालकांवरून कोल्हापूरमध्ये वातावरण तापणार

EPFO Pension Hike : ईपीएफओ पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर! सरकार घेणार मोठा निर्णय; लवकरच वाढणार किमान पेन्शन

SCROLL FOR NEXT