Pune Breaking : पुण्यात शिवसैनिकांकडून किरीट सोमय्या यांना मारहाण; पहा Video  SaamTvNews
मुंबई/पुणे

Pune Breaking : पुण्यात शिवसैनिकांकडून किरीट सोमय्या यांना मारहाण; पहा Video

पुण्यात शिवसैनिकांकडून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना मारहाण

गोपाल मोटघरे

Pune Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांच्या पुणे दौऱ्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज सकाळी गंभीर आरोप केले होते. संजय राऊत (Sanjay Raut) भागिदार असलेल्या व अस्तित्वात नसलेल्या लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस कंपनी या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट देऊन तब्बल शंभर कोटींचा जम्बो कोविड घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यांनतर प्रचंड गदारोळ झाल्याचे आज सकाळपासूनच पाहायला मिळत होते. (Kirit Somaiya Latest News)

पुण्यातील (Pune) जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निघाले होते. परंतु, सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिक (Shivsainik) प्रचंड आक्रमक झाले. पुणे महानगरपालिकेतून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

परंतु, त्याआधीच महापालिकेत शिवसैनिक आणि सोमय्या यांच्यामध्ये प्रचंड बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. किरीट सोमय्या पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटर संदर्भात तक्रार करण्यासाठी आले होते. सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि मोठी झटापट झाली. सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर तेथून नेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सोमय्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर खाली पडले. खाली पडलेल्या सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या मारहाण केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT