Breaking : कामावरून काढून टाकल्यामुळे जाळून टाकल्या मालकाच्या गाड्या! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Breaking : कामावरून काढून टाकल्यामुळे जाळून टाकल्या मालकाच्या गाड्या!

कामावरून काढल्याच्या रागातून एका चारचाकी वाहन चालकाने आपल्या भावाच्या मदतीने आपल्या मालकाच्या जवळपास 22 लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या आग लावून जाळून टाकल्या आहेत.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी गर भागामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कामावरून काढल्याच्या रागातून एका चारचाकी वाहन चालकाने आपल्या भावाच्या मदतीने आपल्या मालकाच्या जवळपास 22 लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या आग लावून जाळून टाकल्या आहेत. वाहन जाळण्याची ही थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदे झाली आहेत. 

हे देखील पहा :

पिंपरी चिंचवड शहारातील इंद्रायणी नगरच्या तीलक रेसिडेन्सी मध्ये ही वाहन जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहन जाळल्या प्रकरणी विनोद किसनराव भस्के आणि अंकित भस्के नामक आरोपी विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी विनोद भस्के हा तक्रारदार विनोद किल्ले यांच्याकडे काही दिवसापूर्वी वाहन चालक म्हणून काम करत होता. मात्र, त्यानं वाहन चालवत असताना आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे पिल्ले यांनी त्याला कामावरून काढलं होतं.

नेमकं याचाच राग मनात धरून आरोपी आणि त्याच्या भावाने आपसात संगनमत करून विनोद पिल्ले यांची वाहने ज्वलनशील पदार्थाने जाळून टाकली आहेत.  वाहन जळाल्यानंतर विनोद आणि अंकित हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. या दोन्ही फरार आरोपी विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी दोन्ही फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

SCROLL FOR NEXT