Badlapur Express Train Fire  Saam TV
मुंबई/पुणे

Badlapur Railway Fire: बदलापूर स्थानकाजवळ रेल्वेच्या डब्याला भीषण आग; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

Badlapur Train Fire: बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला लावण्यात आलेल्या एका एक्सप्रेसच्या बोगीला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट उठले.

Satish Daud

Badlapur Express Train Fire

बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला लावण्यात आलेल्या एका एक्सप्रेसच्या बोगीला शुक्रवारी (२ मार्च) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. क्षणार्धात संपूर्ण बोगीच आगीच्या विळख्यात सापडली. आग इतकी भीषण होती, की परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट उठले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.  (Latest Marathi News)

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीच्या विळख्यात एक्स्प्रेसच्या दोन ते तीन बोगी जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचं मोठं नुकसान झालं आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला सदरील एक्स्प्रेस उभी होती. शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास या एक्स्प्रेसच्या एका बोगीला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण बोगी आगीच्या विळख्यात सापडली.

गाडी साईडिंगला असल्यामुळे त्यात कोणीही प्रवासी नव्हते. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे लोट उठत असल्याने कर्जत येथून मुंबईकडे आणि मुंबईकडून कर्जतकडे जाणारी मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT