Pune Nashik Mahamarg Accident News: Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅक्टर- कारची समोरासमोर धडक; १ ठार, ३ जखमी

Pune Nashik Mahamarg Accident News: पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे येथे टँकर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिन जण गंभीर जखमी झाले आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे, ता. २७ जून २०२४

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. आज रात्री पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे येथे टँकर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज रात्री पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे येथे भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. टँकर आणि कारमध्ये समोरा-समोर धडक होऊन ही घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

किशोर पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून सातारा जिल्ह्याच्या कराडमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारसह ट्रॅक्टरचाही चक्काचूर झाला.

दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु आहे. महामार्गावरील अपघातात निष्पांपाचे बळी जात असल्याने अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा सावंतवाडीला फटका

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

SCROLL FOR NEXT