Breaking news shiv sena 16 mla disqualification supreme court hearing is postpone  Saam Tv
मुंबई/पुणे

Mla Disqualification Case: मोठी बातमी! शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेवरील सुनावणी पुढे ढकलली, काय आहे कारण?

Shivsena Mla Disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती.

Satish Daud

Shivsena Mla Disqualification Case Updates

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. (Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने अध्यक्षांना फटकारलं होतं.

इतकंच नाही, तर विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिल्या होत्या. यावर ६ ऑक्टोबरला सुनावणी घेतली जाईल, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अध्यक्षांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही तयार केले.

६ ऑक्टोबरच्या सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करणार होते. मात्र, आता कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाला सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आला आहे. अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT