Mumbai Govandi Fire News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मोठी बातमी! मुंबईतील गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक

Govandi Fire News: मुंबईतल्या गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी (१८ फेब्रुवारी) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

Satish Daud

Mumbai Govandi Fire News

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी (१८ फेब्रुवारी) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. काही क्षणातच आगीने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा घातला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालं आहे. संसार उपयोगी वस्तू डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. गोवंडी-शिवाजी नगर (Mumbai News) आणि आदर्श नगर हा झोपडपट्टी परिसर असून या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते.

शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला.

त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीचे कारण समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्य निरीक्षण अधिकारी 1.75 लाखांची लाच घेताना ACB च्या सापळ्यात अडकला

Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT