Bomb found in NDA area of Pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील NDA परिसरात सापडला बॉम्ब; बीडीडीएस पथक घटनास्थळी, नागरिकांमध्ये घबराट

Pune Breaking News : पुणे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडला आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडला आहे. खोदकाम सुरू असताना हा बॉम्ब आढळून आहे. यामुळे कामगार चांगलेच धास्तावले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. बॉम्बची माहिती मिळताच बीडीडीएस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहेे.

बॉम्ब निकामी करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आवाहन बीडीडीएस पथकाकडून करण्यात आलं आहे. बॉम्ब निकामी झाल्याचं कळताच पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एनडीए परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. याठिकाणी काही मजूर काम करत असताना त्यांना अचानक बॉम्ब दिसून आला. बॉम्ब आढळून आल्याने कामगार चांगलेच धास्तावले.

त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बीडीडीएस पथकाने तातडीने धाव घेतली. हा बॉम्ब निकामी करण्यात आला असून त्याची पॉवर कमी करण्यात आली आहे.

बॉम्बची विल्हेवाट लावण्यात आली असून नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये, असं बीडीडीएस पथकाने सांगितलं आहे. नेमका हा बॉम्ब कुठून आला? अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती. जवळच एनडीए असल्याने सराव करत असताना अनेक वर्षांपूर्वी हा बॉम्ब पडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT