Ganesh Naik Bungalow Fire  AI Image
मुंबई/पुणे

Ganesh Naik : मोठी बातमी! मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला भीषण आग, मुंबईत आगीचे सत्र सुरूच

Minister Ganesh Naik Bunglow Fire : मंत्री गणेश नाईक यांच्या पावन गड येथील शासकीय बंगल्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Alisha Khedekar

दिवाळीच्या सणात राज्यभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता मंत्री गणेश नाईक यांच्या पावन गड येथील शासकीय बंगल्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्यातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही वेळातच आग आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, आगीमुळे बंगल्याचे किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. एसीमधील शॉर्ट सर्किट हेच आगीचे कारण आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. या घटनेबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोलकाता-मुंबई फ्लाइटमध्ये संशयास्पद चिठ्ठीमुळे खळबळ

Death News : दिवाळीत प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

EPFO : पगारातून PF कट होतोय, पण खात्यात जमा होत नाहीये? घरबसल्या असा तपासा स्टेटस

Headache Symptoms: वारंवार होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका! मायग्रेन नव्हे, गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

Diwali Gift Ideas: दिवाळीला चुकूनही 5 वस्तू भेट देऊ नका

SCROLL FOR NEXT