Breaking News: आर्यन खानला जामीन मंजूर; दिवाळी 'मन्नत'वर Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: आर्यन खानला जामीन मंजूर; दिवाळी 'मन्नत'वर

गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात पुन्हा सुनवाणी झाली. आज आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

सुरज सावंत

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात पुन्हा सुनवाणी झाली. यावेळी आर्यनच्या वतीने प्रसिध्द वकिल मुकुल रोहतगी आणि सतीश माने शिंदे यांनी युक्तिवाद केला. बऱ्याच दिवसापासून आर्यन खानला प्रतिक्षा होती तो दिवस अखेर आज आला आहे. आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे आर्यनचा जेलमधील मुक्काम संपला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट व मुनमुन धामेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उद्या किंवा शनिवार पर्यंत पूर्ण कागदपत्रची प्रक्रिया झाल्यानंतर तिघेही जेलमधून बाहेर येतील असे आर्यनच्या वकिलांनी सांगितलं आहे.

३ ऑक्टोबरपासून आर्यन खान आर्थर रोडच्या कारागृहात आहे. त्या दरम्यान आर्यन खान प्रकरणाला नवनवीन वळण मिळत गेलं. आर्यन खान प्रकरण कसं समीर वानखेंडेंकडे झुकलं हे कळालं देखील नाही. आर्यन खान सह त्याच्या साथीदारांची देखील चौकशी सुरु आहे. एनसीबीने अनन्या पांडेला देखील चौकशीसाठी बोलावले होते. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील चॅट देखील व्हायरल झाले होते.

दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर मोठे आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले होते. परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही अनेक आरोप पुराव्यानिशी मलिक करत आहेत. समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एनसीबीचं एक पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. आणि ते समीर वानखेडे आणि एकंदरितच संपुर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

आर्यन खान प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. पंच म्हणून नेमण्यात आलेल्या प्रभाकर साईलने खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचबरोबर या कारवाईतील मुख्य पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. आज सकाळी गोसावीची वैद्यकीय तपासणी करुण कोर्टात हजर केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टात याचिका; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT