Breaking : आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल ! Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल! पाहा Video

फुटलेल्या पेपर मधील १०० पैकी ९२ प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- प्राची कुलकर्णी

पुणे : आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गैरप्रकार झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांसह राज्यातल्या विरोधी पक्षाने या परीक्षेतील सावळ्या गोंधळावरून राज्य सरकारला आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना धारेवर धरले होते.

आरोग्य विभागामार्फत गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबर च्या रात्रीच फुटल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली. सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ उडाला होता. पेपर फुटीच्या या गंभीर प्रकाराने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.

याच पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू होती. आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी अखेर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुटलेल्या पेपर मधील १०० पैकी ९२ प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

SCROLL FOR NEXT