Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! शिंदे आणि ठाकरे गटाची नावं ठरली; ठाकरेंच्या हाती मशाल

आत्ताच्या घडीची आणि राज्याच्या राजकारणातील महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आत्ताच्या घडीची आणि राज्याच्या राजकारणातील महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अनेक दिवसांचा शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे.

निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांच्या नावाचा वाद मिटला असला तरी शिंदे यांच्या गटाच्या चिन्हाचा वाद मिटला नाहीये.

पाहा व्हिडीओ -

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे त्रिशुल, उगवता सुर्य आणि गदा ही चिन्ह मिळावी अशी मागणी केली होती. तर ठाकरे गटाने त्रिशुल, उगवता सुर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली आहेत.

त्यामुळं शिंदे गटाचं गदा हे चिन्ह रद्द केलं जाणार आहे. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी त्रिशुल आणि उगवता सुर्य हे चिन्ह सादर केली होती ही चिन्ह सारखीच असल्यामुले ही चिन्ह रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

दरम्यान, शिंदे गटाला मिळालेलं 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. मात्र शिंदे गटाने सूचवलेले तीन चिन्ह निवडणूक आयोगाने देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाना नव्याने उद्यापर्यंत चिन्ह सूचवावी लागणार आहेत.

उद्धव ठाकरेच खरे शिवसेनेचे वारसदार - भास्कर जाधव

उद्धव ठाकरेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत. उद्धव ठाकरे पहिल्याच राजकीय लढ्यात यशस्वी झाले आहे. बाळासाहेब ठाकरे नाव आमच्यासोबत राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव नागरिकांच्या नसानसात आहे, असं शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT