प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकाराने प्रेयसीचा गळा दाबुन केला खुन Saam Tv
मुंबई/पुणे

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकाराने प्रेयसीचा गळा दाबुन केला खुन

प्रेयसीकडून सतत होत असलेल्या त्रासाला आणि सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खुन केला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : प्रेयसीकडून girlfriend सतत होत असलेल्या त्रासाला आणि सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून प्रियकराने Boyfriend प्रेयसीचा गळा दाबून खुन Murder केला आहे. यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून पिररंगुट Pirangut आणि मुठा Mutha घाटामध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी Police १२ दिवसात या गुन्ह्याचा छडा लावून, आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही घटना १२ ऑगस्ट दिवशी रात्री ८ वाजता नारायण पेठेत घडली आहे.

रोझिना रियाज पानसरे ऊर्फ कविता चौधरी (वय- ३०) रा. बुधवार पेठ असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हनुमंत अशोक शिंदे (वय- ४०) रा. बुधवार पेठ असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी शिंदे विरुद्ध विश्रामबाग पोलिस Vishrambag Police ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो.

हे देखील पहा-

त्याचे बुधवार पेठ याठिकाणी दुकान आहे. तर रोझिना ही बुधवार पेठेत देहविक्री करते. त्यातूनच दोघांची ओळख झाली होती. शिंदे हा विवाहीत असतानाही त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवलेले होते. शिंदेनेच रोझिनाला नारायण पेठेत एक सदनिका भाड्याने घेऊन दिली होती. रोझिना ही शिंदेला त्याच्यासमवेत राहण्यास जबरदस्ती करत असत. त्याला घरी जाऊ न देता त्याच्याशी सातत्याने भांडणे करत होती. त्यामधून ती रोज देहविक्री करण्याकरिता जात असल्याने त्या दोघांमध्ये वाद होत होते. १२ ऑगस्ट दिवशी रात्री ८ च्या सुमारास शिंदे घरी येत नसल्याच्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली.

यानंतर त्याने तिचा गळा आवळून खुन केला आहे. या घटनेनंतर शिंदे सदनिका बंद करून, अक्कलकोट Akkalkot या ठिकाणी गेला होता. तेथून २ दिवसांनी परतल्यानंतर तो पुन्हा सदनिकेवर गेला. १४ ऑगस्ट दिवशी त्याने रोझिनाच्या शरिराचे तुकडे करून, एका ताडपत्रीच्या पिशवीत ठेवून ते टेम्पोमध्ये भरले होते. यानंतर ताडपत्रीची पिशवी भुगाव ते लवासा घाटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले होते.

या घटनेनंतर तो त्याचे काम नियमीतपणे करत होता. दरम्यान, बुधवार पेठ मधील एक देहविक्री करणारी महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती, त्याबाबत तक्रार फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याबाबतची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस हे शिंदेच्या मागावर होते. त्यांनी पाळत ठेवून, शिंदे यास ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

SCROLL FOR NEXT