boyfriend and girlfriend ended her life journey at Wagholi Lodge pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: सकाळी लॉजवर गेले अन् सायंकाळी भयानक अवस्थेत आढळले; पुण्यात प्रेमीयुगुलासोबत काय घडलं?

Pune Crime News: मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सचिन आणि कोमल वाघोली परिसरातील एका लॉजवर गेले होते.

Satish Daud

Pune Crime News

पुणे शहरातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील लॉजवर एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी, पुणे ), सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी भिंगार,अहमदनगर ) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सचिन आणि कोमल वाघोली परिसरातील एका लॉजवर गेले होते. (Latest Marathi News)

तिथे गेल्यानंतर दोघांनी एक रुम बुक केली. आम्ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत लॉजमध्ये थांबणार त्यानंतर चेक आऊट करणार असं दोघांनीही लॉजच्या मॅनेजरला सांगितलं होतं. दरम्यान, सायंकाळी सहा वाजून गेल्यानंतही दोघेही रुममधून खाली आले नाही. त्यावेळी मॅनेजरने रुममध्ये कॉल केला.

वारंवार फोन करुनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मॅनेजरने लॉजवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाहणी करण्यात सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी बेल वाजवली, तरी प्रेमीयुगुलांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा उघडून आत बघितलं असता, प्रेमीयुगुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कोमल ही डीएमएलटीचे शिक्षण घेत होती. तर सचिन हा खाजगी नोकरीला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

SCROLL FOR NEXT