रिकव्हरी एजंटच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

रिकव्हरी एजंटच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

हफ्ते भरण्यासाठी बँकेच्या रिकव्हरी एजंटने लावला होता तगादा

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई विरार - नालासोपाऱ्यात रिकव्हरी एजंटच्या Recovery agent जाचाला कंटाळून एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्कुटीचे ६० हजारांचे कर्ज फेडता न आल्याने या तरुणाने हा टोकाचे पाऊल उचलला असल्याची माहिती समोर आली आहे. नालासोपाऱ्याच्या तुळींज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बाबुराव सकपाळ असे या तरुणाचे नाव आहे. हफ्ते भरण्यासाठी बँकेच्या रिकव्हरी एजंटने तगादा लावला होता. राहुलची आई भ्रमिष्ट असून ती दोन वर्षांपासून बेपत्ता आहे तर त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.

हे देखील पहा -

राहुल हा नाटकात छोटी मोठी कामे करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. राहुलने स्कुटी घेण्यासाठी कर्ज काढले होते. मात्र कोरोनामुळे आलेल्या बेरोजगारीमुळे त्याच्या स्कुटीचे हफ्ते थकले होते. त्याला बँकेच्या रिकव्हरी एजंट कडून वारंवार हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी त्याने आपल्या मकत्रांकडून देखील ७४००० घेतले होते.

मात्र त्याची फेड करता येत नसल्याने नैराश्यात जाऊन राहुलने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्ये पूर्वी राहुलने सुसाईड नोट लिहत सर्व हकीकत त्यामध्ये लिहिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राहुलचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी त्याच्या मृतदेह पाठवण्यात आला आहे. या घटनेची तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नोंद केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, जवानाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चक्काचूर; ४ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप कडून उमेदवारांची यादी जाहीर

MLC Election: विधानपरिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच; मविआतही नाराजी?

BP Medicine : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

Political News : निवडणुकीआधी विद्यमान आमदाराची हाकालपट्टी, या पक्षाने नेत्यावर का केली कारवाई?

SCROLL FOR NEXT