Ketkai Chitale, Maharashtra, Bombay High Court, Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

21 गुन्हे दाखल असलेल्या केतकी चितळेची अटक टळली; असं नेमकं काय घडलं काेर्टात?

केतकी चितळे ही नुकतीच 40 दिवसांनंतर जेलमधून बाहेर आली हाेती. तिची ठाणे सत्र न्यायालयाने नुकतीच जामिनावर मुक्तता केली आहे.

विकास काटे

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात वकिलाने अवमानकारक केलेली पोस्ट शेअर केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिच्यावर दाखल असलेल्या 21 गुन्ह्यांमध्ये तिला अटक करणार नाही असे निवेदन महाराष्ट्र पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) सादर केले. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने संबंधित निवेदन स्वीकारले आहे. दरम्यान तिने दाखल केलेल्या याचिकेवर आता १२ जुलैला सुनावणी हाेणार आहे. (ketkai chitale latest news)

केतकी चितळे हिला १४ मे रोजी अटक करण्यात आली होती. तिने नितीन भावे याने लिहिलेली पोस्ट शेअर केली होती. ज्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह मजूकर हाेता. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) स्थानिक कार्यकर्ते स्वप्नील नेटके यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन चितळेस अटक करण्यात आली हाेती.

ज्येष्ठ नेते पवार यांची बदनामी करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न, दोन गटांमध्ये द्वेष निर्माण करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानंतर एकूण २२ हून अधिक गुन्हे तिच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले.

दरम्यान आज (सोमवार) पुढील आदेश येईपर्यंत केतकी चितळे हिला पोलीस अटक करणार नसल्याचे निवदेन सरकार पक्षाच्यावतीने सादर करण्यात आले. न्यायालयाने यास मान्यता देत चितळे हिला दिलासा दिला. केतकी चितळे हिच्या बाजूने हरे कृष्ण मिश्रा यांनी कामकाज पाहिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

अभिजित दिपकेंवर गुन्हा दाखल, मुंबईतील विनापरवानगी आंदोलन भोवले; पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT