Mumbai Crime News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन; पोलिसांकडून तपास सुरू

Mumbai Crime News: मुंबईतील इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा कॉलरने केला आहे.

सुरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आली आहे. 112 या हेल्पलाई क्रमांकावर मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तिचा कॉल आला आणि त्याने मुंबईत बॉम्पस्फोट घडवण्याची धमकी (Threat Call) दिली आहे. 112 या हेल्पलाईनवर कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. (Mumbai Latest News)

पाहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा कॉलरने केला आहे. या कॉलनंतर मुंबई पोलिस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी सहारा विमानतळ पोलिस जुहू, आंबोली आणि बांगूरनगर पोलिस स्टेशन आणि सीआयएसएफ आणि बीडीडीएसच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी अनेक तास त्या ठिकाणांची तपासणी केली, मात्र पोलिसांना कोणतीही स्फोटकं किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT