Bollywood Star Saif Ali Khan Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! सैफ अली खानवर चाकू हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू

Bollywood Star Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला केलाय. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालाय.

Namdeo Kumbhar

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

Actor Saif Ali Khan stabbed, admitted to hospital in Mumbai : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला केलाय. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी चाकूने हल्ला झाला आहे. वांदे येथील राहत्या घरी सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला. सैफ अली खान याच्यावर हल्ला का करण्यात आला? याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये सैफ अली खान जखमी झाला आहे. सैफ अली खान याच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वांद्रे पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसलेल्या चोराने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खान याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध घेतला जातोय.

चोरांनी सैफ अली खानच्या घरात डल्ला मारण्यासाठी धडक दिली. त्यावेळी सैफ अली खान याने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला केला. सैफ अली खान याच्यावर सपासप वार केले. चोराच्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झालाय, त्याच्यावर लिलावती रूग्णालयात सर्जरी करण्यात येणार असल्याचे समजतेय. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

Maharashtra News Live Update : लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी, पर्यटकांची पर्यटनासाठी वाढली येण्याची शक्यता..

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

SCROLL FOR NEXT