अबब! बोगस पत्रकारांनी उकळली भंगार विक्रेत्याकडून खंडणी अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अबब! बोगस पत्रकारांनी उकळली भंगार विक्रेत्याकडून खंडणी

अंबरनाथ पश्चिमेच्या फॉरेस्ट नाक्यावरील घटना

अजय दुधाणे

अजय दुधाणे

अंबरनाथ : बोगस पत्रकारांनी Journalist एका भंगार विक्रेत्याकडून ४५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये Ambarnath समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी Police एका महिलेसह तिघांना बेड्या Arrest ठोकल्या आहेत.

हे देखील पहा-

अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावर शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. जांभूळ फाटा भागात राहणाऱ्या विशाल कसोधन याचं फॉरेस्ट नाक्यावर भंगार विक्रीचं दुकान आहे. या दुकानात शनिवारी दुपारी श्रद्धा तिवारी, ब्रिजेश तिवारी आणि अजय रोकडे यांच्यासह अन्य तीन महिला गेल्या आणि त्यांनी दुकानात गेल्या. त्या तिघांनी चित्रीकरण Shooting सुरू करत आमच्याकडे तुमची तक्रार आली आहे, असं सांगत साप्ताहिक पोलीस ऑफिसर, जीवनधारा एनजीओ अशी ओळ्खपत्रं दाखवली आणि पत्रकार असल्याच भासवलं.

यानंतर, चालक अजय रोकडे यांच्यामार्फत त्यांनी या विक्रेत्याकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र तडजोड करून ४५ हजार रुपये घेऊन हे भामटे तिथून फरार झाले. मात्र इतक्यात तिथे पोलीस दाखल झाले. यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी पाठलाग करून पळून जात असलेल्या श्रद्धा तिवारी, ब्रिजेश तिवारी आणि अजय रोकडे यांना पकडलं.

तर अन्य तीन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या. या घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी आधी या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र नंतर खंडणीचाही गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले तिघेही मुंबईचे राहणारे असून त्यांच्यावर यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांनाही सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या इतर तीन महिला साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT