Mumbai News: नारायण राणेंना बजावली जाणार एमआरटीपी ५३ अंतर्गत नोटीस - Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: नारायण राणेंना बजावली जाणार एमआरटीपी ५३ अंतर्गत नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 'आधिश' बंगल्यात काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुमित सावंत

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 'आधिश' बंगल्यात काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बांधकामाबाबत राणेंना एमआरटीपी कलम ५३ अंतर्गत नोटीस बजावली जाणार आहे. (BMC To Issue Notice To Narayan Rane)

राणे यांच्या बंगल्याच्या बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने (BMC) त्यांना नोटीस बजावली होती. काल महापालिका अधिकाऱ्यांनी राणेंच्या (Narayan Rane) बंगल्याची पहाणी केली. त्यात काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले गेले असल्याचे आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाचव्या मजल्यावरील रेफ्यूज एरियामध्ये बांधकाम केल्याचे या पहाणीत स्पष्ट झाले आहे. तसेच महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बंगल्यातील अंतर्गत बांधकाम नसून किरकोळ प्रमाणात अंतर्गत बांधकामात बदल करण्यात आल्याचीही माहीती सूत्रांनी दिली. काही प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम झाल्याने र एमआरटीपी ५३ अंतर्गत नोटीस दिली जाणार आहे.

या नोटीसीनंतर एक महिन्याच्या आत अनधिकृत बांधकाम काढण्यास मुभा दिली जाते किंवा इमारत प्रस्ताव विभागाकडे दंड भरून आणि शिल्लक एफएसआय वापरून हे बांधकाम नियमित करून घेता येते.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा परिणामांना पोलिस प्रशासन जबाबदार - लक्ष्मण हाके

फक्त 32 रुपयांत पेट्रोल-डिझेल! गुजरातमध्ये भन्नाट शोध, 60 अ‍ॅव्हरेजचा दावा

Heartburn: रात्रीच्या वेळेस हार्टबर्नचा त्रास अधिक का होतो?

Maharashtra Politics : मनसेला मोठा धक्का! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ, लवकरच शिंदेसेनेत करणार प्रवेश

High blood sugar: शरीरात ही ५ लक्षणं अचानक दिसली तर समजा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT