BMC Election  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत आणखी एका उमेदवारावर हल्ला; डोकं फुटलं, राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai Crime news : मुंबईत आणखी एका उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना उजेडात आली आहे. या हल्ल्यात उमेदवाराचं डोकं फुटलं आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

महापालिका निवडणुकीला गालबोट

मालाडमध्ये अपक्ष उमेदवारावर हल्ला

उमेदवारावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ

संजय गडदे,साम टीव्ही

मुंबईत महापालिका निवडणुकीला गालबोट लागलं आहे. मुंबईत शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याची घटना ताजी असताना मालाडमध्येही एका अपक्ष उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना उजेडात आली आहे. प्रचारादरम्यान केलेल्या हल्ल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाडच्या वॉर्ड क्रमांक ३४ मधील उपक्ष उमेदवार अरबाज अस्लम शेख यांच्यावर मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली. अरबाज आणि त्यांचं समर्थक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करताना अज्ञातांनी दगडफेक केली. मालाडच्या ५ नंबर मार्केट परिसरात अज्ञातांकडून दगडफेक झाली.

अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात अपक्ष उमेदवार अरबाज शेख यांच्या डोक्यात दुखापत झाली. त्यांचे डोके फुटले. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर उमेदवार अरबाज यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर उमेदवाराच्या मोठ्या भावाने मालवणी पोलिसांसी संपर्क साधला.

मालवणीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या हल्ल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अरबाज अस्लम शेख आणि शारूक अस्लम शेख मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले. या घटनेने निवडणूक प्रचारादरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

तत्पूर्वी, वांद्रे येथे शिंदे गटाच्या उमेदवारावर मंगळवारी चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. शिंदे गटाचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने कुरेशी यांच्या पोटात चाकू भोसकला. या घटनेत कुरेशी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT