BMC Budget Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Budget: शिक्षण समितीला अर्थसंकल्प सादर; मात्र, नव्या शाळांसाठी भरीव तरतूद नाही! (पहा Video)

मुंबई महानगरपालिकेचा सन 2022-23 चा अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात आला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा सन 2022-23 चा अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात आला आहे. सुरुवातीला शिक्षण समितीस अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात येतो. यावेळी मुंबई महापालिकेचे शिक्षण बजेट सादर करण्यात आले. उपायुक्त अजित कुंभार यांच्याकडून शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांना अर्थसंकल्प सादर केला गेला आहे.

मुंबई महापालिकेचा यंदाचा वर्षीचे शिक्षण बजेट 3 हजार 370 कोटी 24 लाखांचं अंदाजित सादर केलेले बजेट आहे. अर्थसंकल्प 'ई' निधी संकेतांक 30 अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹ 2701.77 कोटी एवढे आहे.

नव्या शाळांसाठी भरीव तरतूद नाही?

मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक बजेटमध्ये मुंबईतील नव्या शाळांकरता भरीव तरतूद करण्यात आली नसल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई पब्लिक स्कुलच्या शाळांची संख्या वाढवण्याची घोषणा हवेतच विरली का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. आदित्य ठाकरेंनी प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय बोर्डाची शाळा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये केंब्रिज आणि आय.बी बोर्डाच्या प्रत्येकी एक अश्या केवळ दोनच नव्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची घोषणा करण्यात आली आहे. केवळ २ नव्या शाळांकरता १५ कोटींच्या तरतुदीव्यतिरीक्त कोणतीही भरीव तरतूद नाही.

हे देखील पहा-

BMC अर्थसंकल्पाचे अपडेट्स-

-या अर्थसंकल्पात व्हर्च्युअल ट्रेंनींग सेंटर साठी- ३८ कोटी २ लाख रुपये

-थिंकींग लॅब साठी- 29 लॅब साठी

(या प्रकल्पाद्वारे २५ शाळांमध्ये विद्याथ्यआंची वैचारिक क्षमता वाढून विकास होईल )

-डिजीटल क्लासरुम- २८ लाख तरतुद

-शाळा इमारतींची दुरुस्ती, पुर्नबांधणी - ४१९ कोटी

-शाळांची देखभाल- स्वच्छतेसाठी- 75 कोटी

-यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार

-या नव्या २ शाळांकरता १५ कोटी़ची तरतुद

-खगोलशास्त्रीय प्रयेगशाळांकरता- 75 लाख

-खाजगी प्राथमिक शळांना महारालिकेकडून अनुदान- ४१४ कोटी

-सध्या सिबीएससी च्या ११ आणि आयसीएससी बोर्डाची १ अश्या एकूण १२ शाळा मुंूईत सुरु आहेत

-मुंबई महापालिका शिक्षण बजेटवर आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण विभागाचा ठसा

-मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जंगल सफारी, निसर्ग उद्यान,अभयारण्यांना भेटी घडवणार- तरतुद ३१ लाख

-शाळांच्या अग्निशमन यंत्रणेकरता- २.६४ कोटींची तरतुद

-महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास करता - ४.२५ कोटी

-महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वस्तू वाटपांसाठी १०० कोटी खर्च केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? ३ पदार्थ कोमट पाण्यात मिसळून प्या, रोजचा त्रास होईल बंद

शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

SCROLL FOR NEXT