BMC claims to have filled over 7k potholes on Mumbai roads in three months Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबईतील खड्ड्यांची संख्या घटली? महानगरपालिकेचा दावा; खड्डे दिसल्यास 'हे' करा

Potholes Issue In Mumbai : मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने ७ हजार २११ खड्डे बुजवले आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई : राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा (Potholes) प्रश्न गंभीर आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुनही मुबईतील रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त नाहीत हे स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) मान्य केलंय. बीएमसीने दावा केला आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबई महापालिकेकडून कमी खड्डे बुजवण्यात आले, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्त्यांवर कमी खड्डे पडले असा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. (Potholes Issue In Mumbai News)

हे देखील पाहा -

खड्ड्यांची संख्या घटली

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने ७ हजार २११ खड्डे बुजवले आहे. तर मागच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये याच कालावधीत १० हजार १९९ खड्डे पालिकेने बुजवले होते. म्हणजेच या वर्षी पालिकेने २९८८ कमी खड्डे बुजवले. याचाच हवाला देत मुंबईतील खड्ड्यांची संख्या घटली असा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. तसेच मुंबईतील इतर प्राधिकरणांनी देखील आपल्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजवावेत म्हणून महानगरपालिकेकडून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचंही पालिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.

७ हजारांपेक्षा जास्त खड्डे बुजवले

पालिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रात माहिती दिली की, बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी त्याचप्रमाणे रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पथक आणि कंत्राटदार नेमण्यासह विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यंदा १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर सुमारे ७ हजार २११ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ १२ हजार ६९५ चौरस मीटर इतके आहे. दरम्यान, रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे केले जाते. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, समाज माध्यमं, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार करण्याचे ९ मार्ग

मुंबई महानगरपालिकेने केलेल्या दाव्यानुसार रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या, छायाचित्रे त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) दर्शवलेले खड्डे यांचीही दखल घेवून तातडीने हे खड्डे भरण्यात येतात. जर नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार करायची असेल तर ते खालील ९ मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आपली तक्रार नोंदवू शकतात.

१) ऑनलाइन पोर्टल/अ‍ॅप: MyBMCpotholefixit नावाच्या या ॲपवर मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार नोंदवू शकतात. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

२) आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक: 1916 या क्रमांकावर फोन करुन तक्रार करता येईल.

३) मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र (CFC) याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तक्रार दाखल करता येईल.

४) मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयात लेखी तक्रार देता येईल.

५) १८००२२१२९३ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर फोन करुन तक्रार देता येईल.

६) मुंबई महापालिकेच्या @mybmcroads या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग किंवा मेंशन करुन खड्ड्यांची माहिती देत तक्रार करता येईल.

७) बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999-22-8999 या क्रमांकाद्वारे व्हॉट्सॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार देता येईल.

८) मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागातील रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्सॲप क्रमांक जे पालिकेकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत त्यांना थेट संपर्क साधून खड्ड्यांबाबत तक्रार करता येईल.

९) मुंबई महानगरात, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रेल्वे, खासगी लेआउट याप्रमाणेच इतरही शासकीय प्राधिकरणांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. त्या - त्या रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते, अश्या इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवावी अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी आणि खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे असा दावा पालिकेने केले आहे. तसेच मागील ५ वर्षात ६०८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतील सुमारे ८०० किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे झाले आहेत. अशा रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली निघाल्या आहेत. यापुढे ६ मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांची समस्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT