BJP Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : 'इंडिया'ला टक्कर देणार भाजपचं 'शंखनाद २०२४' अभियान, सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची आज कार्यशाळा

BJP Political News : आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने 'शंखनाद २०२४' अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज मसूरकर

Mumbai News :

विरोधी पक्षांची आघाडी इंडियाची तिसरी बैठक मुंबईत पार पडत आहे. येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. मागील बंगळुरु येथील बैठकीत २६ पक्षांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे यंदा किती पक्ष या बैठकीत सहभागी होतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

एकीकडे इंडिया आघाडीची ताकद वाढत असताना राज्यात विरोधकांना टक्कर देण्यासाठी भाजपने देखील कंबर कसली आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने 'शंखनाद २०२४' अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी निवडणुकीत भाजप सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणार आहे. सोशल मीडियावर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला याद्वारे टक्कर दिली जाणार आहे. 'शंखनाद २०२४' अभियानांतर्गत सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची आज कार्यशाळा होणार आहे.

दादरच्या वसंत स्मृती येथे प्रदेश पदाधिकाऱ्यांची दिवसभर कार्यशाळा पार पडणार आहे. या कार्यशाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस दिल्ली येथील भाजपचे केंद्रीय सोशल मीडिया पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT