Sushma Andhare  Saam TV
मुंबई/पुणे

भाजपवाल्यांना माझ्यावर अटॅक करण्याची संधी मिळणार नाही; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

शिवसेनेला माझी गरज आहे आणि महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे. हा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही झुकणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. अनेक आमदार, खासदारांसह अनेक नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले. मात्र, या परिस्थितीला छेद देत सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते, फुले आंबेडकर विचारांनी प्रेरित अशी सुषमा अंधारे यांची ओळख आहे. सद्याची परिस्थिती पाहता या परिस्थितीला छेद देत सुषमा अंधारे यांचा हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

पाहा व्हिडीओ -

या सर्व पार्श्वभूमिवर सुषमा अंधारे माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, 'संविधनिक चौकट मानणारे धर्मनिर्पेक्ष लोक, झुंज देणाऱ्या उद्धवजी सोबत असले पाहिजेत. माझी पाटी कोरी आहे, माझ्यावर कोणत्याही केसेस नाहीत.

भाजपवाल्यांना माझ्यावर अटॅक करण्याची संधी मिळणार नाही. मी कोणत्याही आमिषाला जाऊन हा निर्णय घेतलेला नाही. माझी सद्सद्विवेक बुध्दी जागी ठेऊन हा निर्णय घेतला आहे. तुमचा सो कॉल्ड हिंदुत्ववाद हा केतकी, कंगना, नुपूर शर्माचा (Nupur Sharma) भंपक आहे. मला आंनद आहे की, माननीय उद्धव ठाकरे या भ्रमात नाही.

या परिस्थितीत मला असे वाटते, शिवसेनेला माझी गरज आहे आणि महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे. हा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही झुकणार नाही, ही मान ताट ठेवण्यासाठी हा पक्ष प्रवेश करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT