Legislative Council Saam TV
मुंबई/पुणे

...तर भाजप विधान परिषदेची पाचवी जागाही लढवणार

राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजप विधान परिषदेची पाचवी जागा लढवण्याच्या तयारीत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजप विधान परिषदेची (Legislative Council) पाचवी जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, राज्यसभेसाठी (RajyaSabha) महाविकास आघाडीने दिलेला चौथा उमेदवार मागे घेतला, तर भाजप (BJP) विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचं देखील समजतं आहे.

त्यामुळे राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. संख्याबळानुसार विधान परिषदेत भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळे आता जर राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडीने मागे घेतला नाही तर भाजप विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवारही देणार आहे. जर भाजपने पाचवा उमेदवार दिला तर विधान परिषद निवडणुक अटीतटीची होणार हे मात्र नक्की.

कसं आहे संख्याबळ -

भाजप आणि मित्रपक्ष मिळून सध्या ११३ संख्याबळ होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. विधान परिषदेवर निवडणूक यायचे असेल तर एका उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता असते. तसंच राष्ट्रवादीकडे ५४, शिवसेना ५६ आणि काँग्रेसचे ४५ आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

दरम्यान, विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीबाबतची प्रक्रिया आज २ जूनपासून सुरू झाली आहे. ९ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार असून या विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT