BJP Saam TV
मुंबई/पुणे

OBC Reservation: 'भाजपला समान नागरी कायदा आणायचाय, आरक्षण ठेवायचं नाही'

'जो डेटा हवा आहे तो केंद्राकडे आहे राज्याकडे नाही. केंद्राने डेटा दिला असता तर ही वेळ आली नसती.'

सुरज सावंत

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसींसाठी राखीव जागा असाव्यात यासाठी राज्य सरकारने दाखल केलेला अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधनाशिवाय तयार करण्यात आला असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्याने आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्दयावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

याच प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, 'ओबीसीचं आरक्षण ठेवून निवडणुका व्हाव्यात अशी आमची भूमिका आहे. राज्यसरकार कुठेही कमी पडले नाही. जो डेटा हवा आहे तो केंद्राकडे आहे राज्याकडे नाही. केंद्राने डेटा दिला असता तर ही वेळ आली नसती. मात्र, भाजपला समान नागरी कायदा (Uniform Civil Code) आणायचा आहे. त्यांना आरक्षणच ठेवायचं नसल्याचे यावरुन दिसतं असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT