Bageshwar Dham Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : बागेश्वर धामच्या भोंदू बाबाला भाजपचा पाठिंबा? काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Bageshwar Dham : बागेश्वर धामच्या भोंदू बाबाला पाठिंबा देणारा भाजप मनुवादी; काँग्रेसच्या नेत्याची टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Atul Londhe News : जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते.

बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ज्या धीरेंद्र शास्त्रीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला त्यावर राज्य सरकार कुठलीच कारवाई करत नाही उलट मीरा रोड येथील दोन दिवसाच्या कार्यक्रमाला परवानगी देते. काँग्रेस (Congress) पक्षाने या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती.

काही संघटनांनी सुध्दा या कार्यक्रमाला विरोध केला आहे, असे असतानाही भाजपाप्रणित सरकार या कार्यक्रमाला परवानगी देऊन ते मनुवादी आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. वारकरी संप्रदायाने कधीही जातपात पाहिली नाही.

जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाला माननाऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले आहे की भाजपा वारकरीविरोधी आहे. जातीपातीच्यावर जाणून एकमेकांना माऊली म्हणणारा वारकरी संप्रदाय भाजपला नको आहे, असे संत, महापुरुष भाजपाला नको आहेत. त्यांना मनुवाद करणारे, जातीभेद करणारे, धर्मावरून तेढ निर्माण करणारे बागेश्वर धामच्या भोंदूबाबासारखे लोक त्यांना हवे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : 6 राशींची चांदी होणार, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा गुरुवारचे राशीभविष्यओ

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

SCROLL FOR NEXT