Pune: BJP Leader Pramod Kondhare Booked for Allegedly Harassing Woman Police Officer Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune : महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा

Pune molestation case, BJP officer misconduct : पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद. प्रमोद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

BJP leader Pune case Update : पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुणे शहरातच नव्हे तर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिस दलातील महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी आता भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद विठ्ठल कोंढरे असं या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आता फरासखाना पोलिस ठाण्यात कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार सोमवारी दुपारी १.३० वाजता पुण्यातील कसबा पोलिस चौकीजवळ घडला. पुणे शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नियोजित दौरा होता. या निमित्त स्थानिक आमदारांसह भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी काही जणं केंद्रीय मंत्री यांची वाट बघत असताना त्याठिकाणी असलेल्या एका चहा च्या दुकानात चहा पिण्यासाठी थांबले होते. त्या पोलिसांचा बंदोबस्त असल्या कारणाने संबंधित महिला पोलिस अधिकारी उपस्थितीत होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या कोंढरे यांनी त्यांना धक्का दिला आणि तसेच त्यांच्याशी गैरवर्तन केले. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे.

दुसऱ्या बाजूला, कोंढरे यांनी त्यांवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. याच घटनेबद्दल कोंढरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात संपूर्ण घटनेचे वर्णन करून संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला "माझा कुठला ही प्रकाराचा धक्का" लागला नाही असं म्हटलं आहे. कोंढरे यांच्याकडे सध्या भाजपच्या पुणे शहराच्या महामंत्री पदाची जबाबदारी आहे. "सत्य परेशान हो सकता है पराजित नही" अशी प्रतिक्रिया कोंढरे यांनी व्हॉट्सॲप च्या माध्यमातून दिली आहे. कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत हृदयद्रावक घटना! 8 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला, शोधमोहीम सुरू|VIDEO

Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT