Lok Sbha Election Saam tv
मुंबई/पुणे

Lok Sabha Election : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीपुढे मोठा पेच; रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

ravindra waikar latest News : मतदारसंघात ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या रविंद्र वायकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका, असं म्हणत विरोध केला आहे.

Vishal Gangurde

सूरज मसूरकर, मुंबई

मुंबई : महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांनी उमेदवारीनंतर प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेला नाही. या मतदारसंघात ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या रविंद्र वायकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका, असं म्हणत विरोध केला आहे. यामुळे या मतदारसंघात महायुतीपुढे मोठा पेच उभा राहिला आहे.

महायुतीमध्ये काही जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम आहे. या जागांमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघातून अभिनेते गोविंदा यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटा प्रवेश केला होता. आता या मतदारसंघातून रविंद्र वायकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

रविंद्र वायकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या चर्चेदरम्यान रविंद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा झाली. मात्र, यानंतर घोटाळ्याचे आरोप असलेल्या रविंद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका, असा सूर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आहे.

भाजप कार्यकर्ते नाराज

'महायुतीचा प्रचार करताना अडचण निर्माण होऊ शकते, अशी नाराजी भाजप कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. अमोल कीर्तिकरांविरोधातील प्रचारात भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे, अशी भावना देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Most Expensive Saree: जगातील सर्वात महागडी साडी, विकत घेण्यासाठी बँकेतून घ्यावे लागेल कर्ज

New Marathi Serial Video : "तुझी सावली तुझ्यासोबत आहे..."; प्रेक्षकांच्या भेटीला येतेय नवीन मालिका, मुख्य भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

पहलगाम हल्ल्यातील Santosh Jagdale यांच्या मुलीला नोकरी कधी? Medha Kulkarni यांनी घेतली Amit Shah भेट

Fertility Problems: करिअरच्या नादात मोठी चूक? नोकरी करणारे ६०% कपल्स प्रजननाच्या आरोग्य तपासणीकडे फिरवतात पाठ

SCROLL FOR NEXT