भाजपचा प्रचार करतो म्हणून पदाधिकाऱ्याला मारहाण, गाडीही फोडली; घटना CCTV मध्ये कैद प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

भाजपचा प्रचार करतो म्हणून पदाधिकाऱ्याला मारहाण, गाडीही फोडली; घटना CCTV मध्ये कैद

अमित आपल्या गाडीने घरी जात असताना तिघे जण आले त्यांनी गाडी अडवत गाडीवर दगड घातला व अमित मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण ग्रामीण मधील भाल गावात भाजप (BJP) पदाधिकारी अमित चिकणकर राहतात आणि याच परिसरात त्याचे कार्यलय आहे. ग्रामीण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष (President of BJP Yuva Morcha) म्हणुन त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित यांनी परिसरात भाजप पक्षाचे काम वेगात सुरू केल्याने काही दिवसापासून काही तरुण त्यांच्याशी वाद घालत होते.

हे देखील पहा -

दरम्यान काल अमित हे कार्यलयाबाहेर उभे असताना सायंकाळी ते तरुण त्यांच्या जवळ आले आणि अमित यांच्याशी वाद घातला. मात्र ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटवला. त्यामुळे अमित देखील तेथून निघून गेले. अमित आपल्या गाडीने घरी जात असताना तिघे जण आले त्यांनी गाडी अडवत गाडीवर दगड घातला व अमित मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र अमित त्यांच्या तावडीतून निसटले.

आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.भाजपचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी देखील घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : हे पदार्थ खाल्ल्याने ७ दिवसातच चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

वारी म्हणजे काय? महाराष्ट्रात वारी कधीपासून सुरू झाली?| Pandharpur Wari 2026

Kidney Health: किडनी अटॅकचा धोका टाळायचाय? लगेचच आहारात घ्या या ७ गोष्टींचा समावेश

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT