bjp mp medha kulkarni News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics :...तर त्यांची व्यवस्था करू; भाजप खासदार मेधा कुलकर्णींना धमकी? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Political News : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना धमकी मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणात पडू नये, अन्यथा त्यांची व्यवस्था करू. मागे त्यांचा तिकीट कापलं होतं, हे त्यांना माहिती आहे, अशा पद्धतीची धमकी यशवंत सहकारी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती आज भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

कराड येथील यशवंत बँकेच्या 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मेधा कुलकर्णी या सातत्याने आवाज उठवत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन ठेवीदारांची बाजू मांडली होती. यशवंत बँकेकडून जवळपास 120 हून अधिक जणांची 140 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवीदारांचा आहे.

ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी या ठेवेदारांच्या बाजूने लढत आहेत. मेधा कुलकर्णी यांनी याआधी देखील सहकार आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. मात्र अद्यापही यामध्ये प्रशासन आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, असं कुलकर्णी यांनी म्हटलं .

केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लवकरच भेटून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी आज म्हटलं आहे. 120 ठेवीदारांची फसवणूक केल्यानंतरही तसेच आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही यशवंत बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना कोण वाचवत आहे, असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

SCROLL FOR NEXT