NCP Saam TV
मुंबई/पुणे

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा लवकरच भांडाफोड करणार; भाजप नेत्याचं खळबळजनक ट्विट

राष्ट्रवादीचा तो नेता नेमका कोण? अशी चर्चा सुरू झालीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तासंघर्षावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना, दुसरीकडे भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी दोन खळबळजनक ट्विट केली आहेत. लवकरच पत्रकारपरिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या भेटीला जाईल, असं देखील कंबोज यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा तो नेता नेमका कोण? अशी चर्चा सुरू झालीये.

मोहित कंबोज यांनी केलेलं पहिलं ट्विट

भाजप नेते मोहित कंबोज यांनी तीन ट्विट केली आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी 'हे ट्विट सेव्ह करून ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार आहे. असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मोहित कंबोज यांचं दुसरं ट्विट

मी लवकरच पत्रकारपरिषद घेणार असून त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करेल, असं मोहित कंबोज यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर, संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील बेनामी संपत्ती, कंपन्या, तसेच नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्तीची यादी जाहीर करणार असल्याचा इशाराही मोहित कंबोज यांनी दिला आहे.

कंबोज यांचं तिसरं ट्विट

सलग दोन ट्विट केल्यानंतर मोहित कंबोज यांनी तिसरं ट्विट देखील केलं. या ट्विटमध्ये त्यांनी परमबीर सिंग यांनी २०१९ मध्ये बंद केलेली सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कंबोज यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा सुरू झाला आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT