Breaking News: भाजप आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल होणार?  Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: भाजप आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल होणार?

पुणे मनपाच्या (Pune PMC) महिला अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजपा आमदार सुनील कांबळें वर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे मनपाच्या (Pune PMC) महिला अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजपा आमदार सुनील कांबळें वर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आमदारांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी मनपाच्या अधिकारी शिर्के यांचा जबाब बंडगार्डन पोलीसानी नोंदवून घेतला आहे. ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी मनपाच्या अधिकारी शिर्के यांच्याशी फोनवरून बोलताना आमदारांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती.

दरम्यान पुण्यातील (Pune) भाजपचे (Bjp Mla) आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांची एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) मागच्या काही दिवसात व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलं. परंतु स्वत: काबंळेंना हा आवाज त्याचं नसल्याचं स्पष्टिकरण दिलं होतं.

ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून फोन करुन शिव्या दिल्याची तक्रार शिर्के यांनी दिली होती. काही कामासाठी वरीष्ठांची परवानगी घ्यावी तेव्हा आमदारांनी शिवीगाळ केली. महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास 2 मिनिटाचं संभाषण झालं. या संभाषणाची ऑडिओ क्लिप तूफान व्हायरल झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

America Attack On Iran: अमेरिकेचा इराणवर आतापर्यंचा सर्वात मोठा हल्ला, 'ऑइल हब' असलेले खार्ग बेट उद्ध्वस्त

Face Wash Uses Tips: फेसवॉशने चेहरा कसा धुवावा?

Nashik Tourism : निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलंय सुंदर पर्यटन स्थळ, नाशिकला गेल्यावर 'येथे' एकदा मारा फेरफटका

SCROLL FOR NEXT