Sudhir Mungantiwar On Cabinet Expansion Saam Tv
मुंबई/पुणे

Cabinet Expansion: "...तर मीही मंत्रिपदाची शपथ घेईन"; मंत्रिपदाबाबत सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar On Cabinet Expansion : मंत्रिमंडळात स्थान मिळेल का असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर त्यांनी मंत्रिपदाबाबत सुचक वक्तव्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भुषण शिंदे

मुंबई: महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार होत आहे. भाजप आणि शिंदे गटाचे किती मंत्री शपथ घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. काल, सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची डिनर डिप्लोमॅसी बैठक पार पडली. जवळपास तीन तास ही बैठक पार पडल्यानंतर मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, रवींद्र पवार, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे बाहेर पडले. यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर त्यांनी मंत्रिपदाबाबत सुचक वक्तव्य केलं आहे. (Maharashtra Cabinet Expansion News)

हे देखील पाहा -

माध्यमांशी बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "आज मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे शपथ घेणाऱ्या मंत्र्याची यादी सोपवणार आहे. सकाळी ११ वाजता शिंदे गटाचे आणि भाजपचे आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील आणि कुणाला कोणतं मंत्रिपद मिळेल तसेच किती कुणाचे किती मंत्री असतील हे लवकरच स्पष्ट होईल" असे सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले. तसेच "तुमच्या सदिच्छा राहिल्या तर मीदेखील उद्या शपथ घेईन आणि माझं नाव त्या यादीत असेल" असं सुचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान आज, मंगळवारी भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे. यात शिंदे गट आणि भाजप यांचे मिळून १२ ते १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून (BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा हे आमदार शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.

या मंत्रिमंडळात भाजप आमदार नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा या चार नव्या आमदारांना मंत्रिपदावर संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप गृहखात्यासह महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना प्राधान्य

दरम्यान मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी मिळणार आहे, असे कळते. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे, असेही सांगण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT