Amol Kolhe : पैशांसाठी 'अशी' कृत्य करायची हा अमोल कोल्हेंचा धंदा - प्रसाद लाड Saam TV
मुंबई/पुणे

Amol Kolhe : पैशांसाठी 'अशी' कृत्य करायची हा अमोल कोल्हेंचा धंदा - प्रसाद लाड

'सामना वाचत तरी कोण? सामना फक्त आता सकाळच्या कामासाठी उपयोगाचा आहे.' संजय राऊत काय बोलतात काय लिहितात याला महत्व देऊ नये.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : अमोल कोल्हे हे नाटककार आहेत, चित्रपटात काम करणारे कलाकार आहेत. ते कलाकारासारखेच वागणार नथुरामाना (Nathuram) विरोध दाखवायचा आणि पुन्हा पैसे मिळतात म्हणून कृत्य करायचे हा यांचा धंदा आहे. राष्ट्रवादी काय शिवसेना काय काँग्रेस काय (NCP, Shivsena, Congress) चेहऱ्यावर एक दाखवायचं करायचं वेगळं. अशी घणाघाती टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादी पक्षावरती केली आहे.

काल अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सिनेमामध्ये नथुराम ही भुमिका साकारली म्हणून महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करत आत्मक्लेश केला होता आणि यावरुनच आज लाड यांनी ते पैशांसाठी असली कृत्य करतात ते कलाकारच आहेत अशी टीका केली आहे.

सामना सकाळच्या कामासाठी उपयोगाचा -

दरम्यान त्यांनी यावेळी सामनावरती (Samana) देखील जहरी टीका केली आहे 'सामना वाचत तरी कोण? सामना फक्त आता सकाळच्या कामासाठी उपयोगाचा आहे.' संजय राऊत काय बोलतात काय लिहितात याला महत्व देऊ नये, तसंच संजय राऊतांनी (Sanjay Raut) युतीबाबत आम्हाला शिकवू नये आताच्या नवीन शिवसेनेसोबत भाजपला युती करायची नाही. पूर्वी जी युती होती ती बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सेनेसोबत होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीची आम्हाला गरज नाहीये असंही लाड म्हणाले आहेत. तसंच या बजेटमधून निश्चित काहीतरी चांगले मिळेल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT