Prasad Lad Saam TV
मुंबई/पुणे

Political News : चंद्रशेखर बावनकुळेंवर बोलताना तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे कपडे फाडू, प्रसाद लाड यांचा अरविंद सावंतांना इशारा

Prasad Lad : तुमचा बॉस नावाचा पोपट मरायला आला आहे. म्हणून घराबाहेर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर भाजप-शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमने-सामने आले आहेत. अरविंद सावंत यांच्या टीकेला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काल परवापर्यंत घरी बसलेले, झोपी गेलेली जागे झाले. उकळत्या पाण्याला खळखळाट फार अशी, परिस्थिती अरविंद सांवतजी तुमची झाली आहे. तुम्ही बावनकुळे साहेबांबद्दल बोलत असातना तोंड सांभाळून बोलावं, अशी विनंतीवजा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली.

तुमचा बॉस नावाचा पोपट मरायला आला आहे. म्हणून घराबाहेर आला आहे. अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना घरातून कधी बाहेर पडले नाहीत, जनतेला भेटले नाहीत, मानेला पट्टे लावून फिरलात. आता तुम्ही आम्हाला सांगता बानवकुळे साहेब खुळे आहेत. बावनकुळे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोला, अन्यथा तुमचे कपडे फाडू, असा इशाराही प्रसाद लाड यांनी अरविंद सावंत यांना दिला आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. (Political News)

काय म्हणाले होते अरविंद सावंत?

बावनकुळेंच्या टीकेला उत्तर देताना अरविंद सावंत यांनी म्हटलं की, देशाचे पंतप्रधान किती फिरले ते सांगावे. कोरोनात कोण फिरत होतं? योगी फिरत होते का, गुजरातचे मुख्यमंत्री फिरले का, दाखवा व्हिडिओ. जणाची नाही तर मनाची लाज ठेवा. गंगेमध्ये प्रेत वाहत होते. ज्यांनी प्राण वाचवले त्यांचं कौतुक नाही.

घरात बसून कारभार करता करता उद्धव साहेब कुटुंब प्रमुख झाले. लोकांच्या हृदयात कधी स्थान मिळवलं कळलंही नाही. हेच स्थान डळमळीत करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत, त्याची दखल घेण्याची गरज नाही, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.

Publish By- Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Famous Place: गोव्यातील 5 प्रसिद्ध ठिकाणे, एकदा गेलात की परत यावस वाटणार नाही

मोठी बातमी! देशाचे नवे सरन्यायधीश ठरले, CJI गवईंनी केली शिफारस

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Aapli Aaji : लिहिता-वाचता येत नाही, पण महिन्याला कमावते ७ लाख, नगरची 'आपली आजी' देशात फेमस, वाचा

Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'थामा'चा जलवा; तर 'एक दीवाने की दीवानियत' फ्लॉप? वाचा संडे कलेक्शन

SCROLL FOR NEXT