devenndra Fadnavis and pravin darekar  saam Tv
मुंबई/पुणे

'फडणवीसांची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, पण...'; दरेकरांनी स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्रीपदावरून भाजप नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्रीपदावरील नाराजीनाट्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय डाफ

मुंबई : काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय या पदामुळे फडणवीस (Devendra Fadnavis) नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. तर फडणवीसांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फोटा गायब होता. तर उपमुख्यमंत्रीपदावरून भाजप नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्रीपदावरील नाराजीनाट्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Devendra Fadnavis News )

प्रवीण दरेकर म्हणाले, एकनाथ शिंदे हे आज मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवावा. माझी शिवसेना की तुझी शिवसेना यात पडू नये. राज्याच्या जनतेचा विचार करावा. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे. कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केले. मात्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसविले. फडणवीस यांची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र पक्ष नेतृत्वाने आग्रह केल्यानं त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले'

केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं : देवेंद्र फडणवीस

काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय या पदामुळे फडणवीस (Devendra Fadnavis) नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. तर फडणवीसांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फोटा गायब होता. तर उपमुख्यमंत्रीपदावरून भाजप कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या नाराजीनाट्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याची कबुली दिली आहे. पुढे फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले,'सरकार आपल्या हक्काचं आलं आहे. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका. सर्वांनी आता जनतेसाठी काम करा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Tanker: भारताला मोठा दिलासा! ईराणी 'चक्रव्यूह'ला भेदून मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पाहा VIDEO

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT