Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

'पाटणकरांकडून कुठे कुठे पैसे गेलेत हे बाहेर आल्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर देता येणार नाही'

'एकच नव्हे तर अजून खूप नेत्यांनी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्राला लुटलं आहे'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज ईडीने राज्य़ाचे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांची संपत्ती ईडीने जप्त करत मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे ठाकरे सरकारसाठी एक मोठा धक्का समजला जात आहे. ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधल्या ११ सदनिकांवरती ही कारवाई करण्यात आली असून पुष्पक ग्रुपची (Pushpak Group) सहा कोटी ४५ लाखांती प्रॉप्रटी जप्त करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) मेहुणे हे महापालिकेचे कंत्राटदार आहेत, त्यांच्याकडून कुठे कुठे पैसे पाठविण्यात आले आहेत ते बाहेर आल्यावर उद्धव ठाकरेंना उत्तर देता येणार नाही. तसचं हे एकच नव्हे तर अजून खूप नेत्यांनी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्राला लुटलं आहे आणि याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं आहे. ते साम टीव्हीशी बोलत होते.

या कारवाई वरुन आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यावरती टीकास्त्र करायला सुरुवात केली आहे. श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरे यांचा मेहुणा मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यामध्ये शेल कंपन्यांचा वापर केला असल्याने त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. असं ट्विट करत, घोटालेबाजों को छोडेंगी नही असं म्हणत भाजप नेते आणि महाविकास आघाडीचे सतत घोटाळे बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्यांनी ट्विट केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT