हिरव्यायुती सोबत मुख्यमंत्र्यांनी लोटांगण घातल्याने राज्यात हिंसाचार : सोमय्या  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

हिरव्यायुती सोबत मुख्यमंत्र्यांनी लोटांगण घातल्याने राज्यात हिंसाचार : सोमय्या

मुख्यमंत्र्यांनी हिरव्या युतीसोबत जे लोटांगण घातले आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रात अशा प्रकारची अवस्था उभी राहिली आहे, अशी घणाघाती टिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकारवर केली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : मुख्यमंत्र्यांनी हिरव्या युतीसोबत जे लोटांगण घातले आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रात अशा प्रकारची अवस्था उभी राहिली आहे, अशी घणाघाती टिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकारवर केली आहे. इतकेच नाही तर संपाला जिद्दीचा प्रश्न बनवू नये असेही विधान किरीट सोमय्या यांनी केले. सोमय्या हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी कल्याण एसटी डेपोत आले होते.मात्र, ते दिलेल्या वेळेत आले नाही आणि तब्बल 2 तास उशिरा आले. सोमय्या येण्यापूर्वीच एसटी आगारातील लाईट गुल झाली होती आणि ते गेल्यानंतर पुन्हा लाईट आली. त्यामुळे हा ही एक चर्चेचा विषय बनला होता.

हे देखील पहा :

दुसरीकडे राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अनेक कामगारांना कामावर हजर न झाल्याने डेपो प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये महामंडळ विलीन करण्याच्या आंदोलनावर ठाम आहेत. कल्याणमधील एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाटी किरीट सोमय्या, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी कार्यकर्ते कल्याण बस डेपोत आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सरकारवर जोरदार टिका केली. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची चेष्टा करुन नये. संपाला जिद्दाचा प्रश्न करु नये. कामगारांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात असे सोमय्या यांनी सांगितले. राज्यभरात ठिकठिकाणी त्रिपूरा घटनेचे पडसाद उमटले आहे. यावरही किरीट सोमय्या यांनी सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी खुर्चीसाठी हिरव्या युतीसोबत लोटांगण घातले आहे. रजा अकादमीचे लोक बाहेर आहेत. ज्यांनी अफवा पसरविली त्यांना जेलमध्ये का टाकत नाही याकडे लक्ष वेधले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT