Kirit Somaiya, Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

CM उद्धव ठाकरेंना किरीट सोमय्यांचं पुन्हा खुलं आव्हान

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे १४ मे दिवशी मुंबई सभा घेणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (Shivsena) आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपने मुंबईत सभा घवून शिवसेनेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे १४ मे दिवशी मुंबई सभा घेणार आहेत. या सभेची जाहिरात सुरु आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. 'या सभेत उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तरे द्यावीत, असं आव्हान किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांना त्यांच्यावर आणि त्यांच्या मंत्र्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तरे देता येत नाहीत, म्हणून ते टीव्हीवर सभेचे टीझर चालवून दिशाभूल करत असल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर साडे सहा कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर सात कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रश्नांचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे असे किरीट सोमया म्हणाले.

उल्हासनगरातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर भाजपचे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात माजी खासदार किरीट सोमय्या सहभागी झाले होते. सोमय्या यांना ट्विटरवुरन धमकी आली असल्याचा आरोप केला. यावर पोलिसांनी २४ तासात कारवाई करा असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला आहे. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावरही टीका केली.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

SCROLL FOR NEXT