bjp leader pankaja munde  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News: पंकजा मुंडे पक्ष सोडून जातील का? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

संदिप नागरे

Chandrashekhar Bawankule News: 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे भाजप पक्ष सोडतील का, अशीही एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलं आहे. याचदरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. बावनकुळे यांनी हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेवर भाष्य केलं आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्ष सोडून जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. आता पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केलं आहे. 'पंकजा मुंडे या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवत असून पंकजा मुंडेंच्या रक्तारक्तामध्ये भाजप आहे. पंकजा मुंडे या पक्ष सोडून जातील असा विचारही कोणी डोक्यात आणू नये, असं बावनकुळे म्हणाले.

तर संजय राऊत यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, 'शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत दररोज आपल्या विरोधकांवर टीका करताना तुटून पडतात. मात्र, संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपने आता अधिकृतरित्या आमदार नितेश राणे यांची प्रवक्ते म्हणून निवड केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रत्येक टीकेला आता नितेश राणेच उत्तर देतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT