Uddhav Thackeray/ Nana Patole  Saam TV
मुंबई/पुणे

"शिवसेनेएवढी टक्केवारी काँग्रेसला पोहोचली नसल्याने नाना टीका करतायत"

'भाजप खोटा पक्ष आहे, एक्साईज कमी केले. केंद्राने अकरा रुपये वाढवले आणि त्यातले काही कमी केले, सेस कमी केलाच नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : जेवढी टक्केवारी शिवसेनेकडे पोहोचली असेल तेवढी काँग्रेसला पोहचली नसेल, म्हणून नाना पटोले टीका करत असल्याचं वक्तव्य भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी केलं आहे. राज्य सरकारने काल राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात केल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपने टीका करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने ट्विट करुन इंधनाची दरकपात केल्याची माहिती दिली आहे ती शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप भाजपच्या अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भातखळकर म्हणाले, राज्य सरकारला जर दरांमध्ये कपात करायची होती तर त्यानी टक्केवारीत कपात करायला हवी होती. व्हॅटमध्ये त्यांनी कपात केली पाहिजे. किमान १० रुपये कपात केली पाहिजे. तसंच राज्याने आपला व्हॅट कमी केला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, इंधनाच्या दरांवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज केंद्र सरकारवर टीका केली. 'भाजप खोटा पक्ष आहे, एक्साईज कमी केले. केंद्राने अकरा रुपये वाढवले आणि त्यातले काही कमी केले, सेस कमी केलाच नाही. केंद्राने राज्याचे नुकसान केलं असल्याची टीका नाना यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भातखळकरांनी उत्तर दिलं आहे.

हे देखील पाहा -

भातखळकर म्हणाले, "नानांनी आधी स्वतःचे घर नीट कराव, आधी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel) दरवाढ कमी करावी, सोनिया गांधी यांनी पत्र पाठवून ज्या गोष्टी सांगितल्या त्या देखील मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या नसल्याची टीका त्यांनी पटोलेंवरती केली. शिवाय जेवढी टक्केवारी शिवसेनेकडे पोहोचली असेल तितकी काँग्रेसला गेली नसेल म्हणून नाना टीका करत यांचा विरोध तकलादू आहे" असं भातखळकर म्हणाले.

दरम्यान, त्यांनी यावेळी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हे राज्य सरकारमुळे गेलं असल्याचा पुनरुच्चार भातखळकरांनी केला. महाभकास आघाडीने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली. मुख्यमंत्री लक्ष घालत नाहीत, हे आम्ही दोन वर्षांपासून करतोय तेच आता नाना पटोले करत आहेत असंही भातखळकर म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT