Girish Mahajan  Saam Tv
मुंबई/पुणे

Kasba Byelection: आजारी गिरीश बापट व्हीलचेअरवर प्रचारात, लाडक्या नेत्याची अवस्था पाहून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, पाहा VIDEO

गिरीश बापट यांना प्रचारात उतरवण्यावरून भाजपवर विरोधकांनी जोरदार टीकाही केली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Byelection : भाजपने कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट स्वत: प्रचारात उतरले आहेत. गिरीष बापट यांची तब्येत ठिक नसतानाही ते प्रचारात उतरले आहेत. मात्र त्यांना व्हीलचेअरवर पाहून महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. गिरीश बापट यांना प्रचारात उतरवण्यावरून भाजपवर विरोधकांनी जोरदार टीकाही केली आहे.

गिरीश बापट यांनी परवाच आजारपणामुळे मी प्रचारात सहभागी होणार नाही असं निवेदन जाहीर केलं होतं. मात्र आज त्यांना प्रचारात उतरावं लागतं आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांना अॅम्बुलन्सने व्हीलचेअर आणण्यात आलं. यावेळी त्यांना ऑक्सिजन लावला असल्याचंही दिसत आहे. (Political News)

गिरीश बापट येताच, ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट ‘ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. कसबा भाजपा जिंकणार हा विश्वास यावेळी बापटांनी व्यक्त केला. कसब्याने माझ्या कारकिर्दीला आकार दिला आहे. कसब्याने भाजपाला कायम साथ दिली आहे. कसबा म्हणजे भाजप, असं त्यांनी म्हटलं.

खूप दिवसांनी सर्वांना भेटलो. खूप काम करा. हेमंतचं काम चांगलं आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. थोडी जास्त ताकद लावा विजय आपलाच आहे. काळजी करु नका, असं गिरीश बापट यांनी म्हटलं.गिरीश बापट बोलत असताना त्यांना दम देखील लागत होता. मात्र आपल्या लाडक्या नेत्यांला असा अवस्थेत पाहून उपस्थित महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

SCROLL FOR NEXT