Ramdas Tadas  Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भाजपचे वर्चस्व; रामदास तडस नवे अध्यक्ष

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक (Election) बिनविरोध होणार आहे. कुस्तीगीर परिषदेत तिघांपैकी दोघांनी अर्ज माघार घेतले आहेत ,त्यामुळे कुस्तीगीर अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. काकासाहेब पवार आणि धवनसिंग मोहिते -पाटील यांनी अर्ज माघार घेतले आहेत.

याअगोदर कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या ताब्यातून कुस्तीगीर परिषद गेल्याची बोलले जात आहे.

हे देखील पाहा

भाजप (BJP) खासदार रामदास तडस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. यावेळी अनेक चर्चा झाली होती. राज्यात काही दिवसांपूर्वी सत्ताबदल झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. दरम्यान, आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भाजप खासदार रामदास तडस असणार आहेत तर काकासाहेब पवार सचिव, तर वैभव लांडगे उपाध्यक्षपदी असणार आहेत.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या (BJP) तिकिटावर दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून (Election) आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT