Public Service google
मुंबई/पुणे

BMC News Mumbai: भाजप नगरसेवकाचा मोठा निर्णय; ५ वर्षांचं मानधन, भत्ते महापौरनिधीला देणार, इतर नगरसेवकांची भूमिका काय?

Public Service: भाजप नगरसेवकाच्या एका मोठ्या निर्णयामुळे इतर नगरसेवकांच्या कामात पुन्हा एकदा ऊर्जा आणि नव्या विचारसरणीची भर पडली आहे. हा निर्णय घेतल्यामुळे इतर नगरसेवकांची भूमिका कशी असेल याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

Sakshi Sunil Jadhav

भाजपचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका निवडणुकीत नुकतेच ते विजयी झाले होते. त्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वत्र याची चर्चा प्रसारित होत आहे.

जनसेवा आणि जनकल्याणाप्रती आपली अटळ बांधिलकी दर्शवत नगरसेवक, स्थायी व विधी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी एक स्तुत्य आणि प्रेरणादायी पाऊल उचलत आपले संपूर्ण वेतन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तिवाना हे नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड ४७ मधून विजयी झाले असून त्यांनी आपल्या पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन तसेच विविध समिती बैठकींसाठी मिळणारे सर्व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर महोदयांना निवेदनही सादर केले आहे.

यावेळी तिवाना म्हणाले, “नगरसेवक म्हणजे जो नगराची सेवा करतो, आणि ही सेवा निस्वार्थ भावनेने व्हायला हवी. जनसेवा ही माझ्यासाठी एक संकल्प आहे. जनप्रतिनिधीचे पहिले कर्तव्य म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे. याच भावनेतून मी माझ्या संपूर्ण कार्यकाळातील मानधन आणि सर्व भत्ते महापौर निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.”

त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही रक्कम गरजू मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयोगी ठरेल.

भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये युवा उमेदवारांना प्राधान्य देत नव्या ऊर्जेसह आणि नव्या विचारसरणीसह महानगरपालिकेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.

तेजिंदर सिंग तिवाना यांची ही पुढाकार केवळ त्यांच्या जनसेवेतील निष्ठेचे प्रतीक नाही, तर इतर जनप्रतिनिधींसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT