Salman Khan Saam Tv
मुंबई/पुणे

सलमान खानला आलेल्या धमकी प्रकरणी नवी माहिती समोर; मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

काही दिवसापूर्वी सलमान खान आणि वडिल सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काही दिवसापूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडिल सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाले होते. यामुळे बॉलीवूड जगतात खळबळ उडाली होती. या संबंधी मुंबई पोलिसात (Police) तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी धमकीच्या पत्रा प्रकरणी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे आलेले हे पत्र लॉरेन्स बिष्णोई या टोळीकडूनच आल्याची माहिती आज मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबई (Mumbai) पोलिसांनी पंजाब, दिल्ली येथे जाऊन या पत्रा विषयी चौकशी केली. हे पत्र लॉरेन्स बिष्णोई टोळीनेच आपली दहशत वाढवण्यासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीची ताकद दाखवून बॉलीवूडमध्ये आपली दहसत वाढवायची आणि खंडणी गोळा करायची, यासाठी हे पत्र पाठवल्याचे माहिती समोर आली आहे.

हरियाणा पोलिसांच्या क्राईन ब्रॅचने गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) यांच्या हत्येत सामील असणाऱ्या पुण्यातील संशयित आरोपी संदीप महाकाल आणि संतोष जाधव यांची चौकशी केली. हे दोन्ही आरोपी विक्रम बराड याच्या ऑनलाईन संपर्कात आहेत, पण काही दिवसापासून त्यांच्यात संपर्क झाला नसल्याचे समोर आले आहे.

सलमान खान याला आलेल्या धमकीच्या पत्राच्या चौकशीत राजस्थान मधील हनुमानगड येथील राहणाऱ्या विक्रम बराड याचे नाव समोर आले आहे. यालाच धमकीच्या पत्रासंबंधी मास्टर माईंड मानले जात आहे. यासह संशयित दोघांची नावे समोर आली आहेत. हे सर्व आरोपी लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधीत आहेत, आणि राजस्थानातील जालोर येथील राहणारे आहेत. हे तिघेही मुंबईतील कल्याणमध्ये थांबले, आणि कथित धमकीचे पत्र पाठवले होते.

सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान यांना ५ जून रोजी जॉगिंग करताना बेंचवर एक पत्र मिळाले होते, यामध्ये त्यांना आणि सलमान खानला धमकी देण्यात आली होती. त्यांची अवस्थाही सिद्धू मुसेवालासारखी केली जाईल, असे लिहिले होते. खाली पत्रात 'जी.बी. LB' लिहिले होते. त्यावरून हे कुख्यात गुंड गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई असू शकतात, असा अंदाज बांधला जात होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेची जबाबदारी कॅनडात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT