Supriya Sule Wish to Sharad Pawar on His 83rd Birthday Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar's 83rd Birthday : लढेंगे-जितेंगे... सुप्रिया सुळेंच्या 'बाबां'ना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, हृदयस्पर्शी पोस्ट

Supriya Sule Wish to Sharad Pawar Birthday: खासदार सुप्रिया सुळे यांनी 'लढेंगे-जितेंगे' म्हणत शरद पवार यांच्यासाठी खास पोस्ट लिहत शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रविण वाकचौरे

Sharad Pawar's 83rd Birthday:

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. शरद पवार यांचा आजचा वाढदिवस काहीसा वेगळा आहे. कारण प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीतला शरद पवार यांचा सर्वात संघर्षाचा काळ आहे. पक्ष फुटल्यानंतर या कठीण प्रसंगाचा देखील शरद पवार मोठ्या हिमतीने सामना करताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी 'लढेंगे-जितेंगे' म्हणत शरद पवार यांच्यासाठी खास पोस्ट लिहत शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest News Update)

सुप्रिया सुळे यांची पोस्ट

आधी लढाई जनहिताची !!!

प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.

मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची ८३ वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे.

आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.

संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.

लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT