Navi Mumbai Firing CCTV Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Firing: बाईकवरून आले अन् ६ राऊंड फायरिंग करून गेले, नवी मुंबईतल्या गोळीबाराचा थरार CCTV मध्ये कैद

Navi Mumbai Firing CCTV: नवी मुंबईच्या सानपाडामध्ये झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेमध्ये एक जण जखमी झाला आहे.

Priya More

नवी मुंबईमध्ये गोळीबाराची घटना घडली. सानपाडा येथील डीमार्टसमोर गोळीबाराची ही घटना घडली. ५ राउंड फायर करुन आरोपी फरार झाले. या घटनेमध्ये एक जण जखमी झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये गोळीबाराचा थरार पाहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे घटनास्थळी भीतीचे वातावरण होते.

सानपाडा- जुईनगर येथील डी मार्टसमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक दुपारच्या सुमारास घडली. दुचाकीवर आलेल्या २ जणांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. तब्बल ५ राऊंड फायर करुन आरोपी फरार झाले असून यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. जखमीला मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम देखील तपास करत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु असून सखोल तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT